आमची ओळख

ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत. हेच ब्रीद मनाशी ठेवून गेली १६० वर्षे करवीर नगर वाचन मंदिर वाटचाल करीत आहे.

आजीव सभासद

१८ वर्षावरील कोणाही व्यक्तीस या नोंदणीकृत संस्थेस , रु.१०,००० /- रोख वा धनादेशाद्वारे

अथवा कार्यकारिणीने मान्य केलेल्या रु.२५,००० /- किंमतीची पुस्तके वा वस्तुद्वारा सभासदत्व मिळेल

अशा सभासदांना १५ दिवसांच्या मुदतीने २ पुस्तके घरी वाचावयास नेता येतील

साधरण सभासद

१८ वर्षावरील कोणाही व्यक्तीस अनामत रु.५०० /-

प्रवेश शुल्क रु.५० /-

इमारत निधी रु.१०० /-

मासिक वर्गणी रु.८५ /-

असे एकूण रु.७४५ /- भरून सभासद होता येईल

वार्षिक वर्गणी भरल्यास दोन महिन्यांची वर्गणी सवलतीसह रु.८५० /- राहील

रु५०० /- किंमतीचे पुस्तक १५ दिवसांच्या मुदतीने घरी वाचावयास नेता येतील

बाल सभासद

६ ते १२ वर्षांपर्यंतची मुले / मुली : अनामत रु.७५ /-

एक महिन्याची वर्गणी रु.२५ /-

वार्षिक वर्गणी रु.२५० /-

बालविभागातील १ पुस्तक १५ दिवसांच्या मुदतीने घरी वाचावयास नेता येतील

टीप : परगावच्या साधारण सभसदांनी नवीन सभासद नोंदणी करताना जादा अनामत रु.२०० /- भरावी लागेल.

 • सभासदांनी प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी वर्गणी भरणेची असून दोन महिन्यांपेक्षा जास्त वर्गणी बाकी राहिल्यास त्या सभासदाचे सभासदत्व रद्द होईल.
 • सभासदांनी जरी पुस्तक नेले नाही, तरी त्याची वर्गणी चालू राहील. जोपर्यंत सभासदाचे सभासदत्व बंद / रद्द होत नाही तोवर सभासदत्व चालू राहील.
 • पुस्तकाची देवघेव : सभासदास स्वतः अगर अधिकृत प्रतिनिधीमार्फत पुस्तक नेता येईल व आपले देवघेव कार्ड घेता येईल. परत पुस्तक घेताना देवघेव कार्ड कार्यालयात जमा करावे लागेल.
 • सभासदानी पुस्तक घेतलेल्या दिवसापासून सूचित केलेल्या मुदतीत परत केले पाहिजे. पुन्हा सभासदास तेच पुस्तक पाहिजे असल्यास व दुसऱ्या सभसदाची मागणी नसल्यास घेता येईल.
 • नवीन पुस्तके मात्र सभासदानी नेलेल्या तारखेपासून सात दिवसाचे आत परत करावीत. सभासदाला दिवसातून फक्त एकदाच पुस्तकाची देवघेव करता येईल.
 • विंलब शुल्क: विंलब शुल्क दर दिवशी जुन्या पुस्तकास   रु. २  व नवीन तसेच अग्रहक्क (क्लेम) नोंदणीच्या पुस्तकास   रु. ५   राहील. सदरचा नियम सर्व प्रकारच्या सभसदाना लागू आहे.
 • अग्रहक्क नोंदणी: जर पुस्तकाला अग्रहक्क लावायचा असेल, तर क्लेम फी   रु. १ /-   प्रति पुस्तक भरावी लागेल. एकाचवेळी जास्तीत जास्त पाच पुस्तकांना अग्रहक्क लावता येईल.
 • गहाळ पुस्तकाबाबत : पुस्तक गहाळ झाल्यास अथवा खराब झाल्यास सभासदांना त्या पुस्तकांची नवी प्रत द्यावी लागेल अथवा पुस्तकाच्या किमतीच्या दीडपट रक्कम संस्थेकडे भरावी लागेल. मात्र पुस्तक जुने किंवा दुर्मिळ असल्यास व्यवस्थापना समिती ठरवेल ती किंमत सभासदास द्यावी लागेल.
 • खराब पुस्तक: सभासदाने पुस्तक नेतेवेळी खराब किंवा फाटके असल्यास नोंदणी कारकूनाकडून तशी नोंद करुन घेणे गरजेचे आहे. पुस्तक वाचकाकडून फाटलेले आढळल्यास दंड आकारला जाईल, याची नोंद घ्यावी.
 •   रु. ५०० /-  हून ज्यादा किंमतचे पुस्तक नेतेवेळी सभासदना पुस्तकाच्या किमतीनुसार जादा अनामत रक्कम ठेवावी लागेल.
 • सभासदाने महिन्याच्या कोणत्याही तारखेस नाव कमी केल्यास त्या सभासदाला त्या महिन्याची संपूर्ण वर्गणी भरावी लागेल.
 • सभसदानी आपल्या सूचनांची वा तक्रारींची लेखी नोंद मा. ग्रंथपाल यांचेकडे करावी.